Nitin Gadkari Threat Calls: नितीन गडकरींना कर्नाटक तुरुंगातून आले होते धमकीचे फोन; नागपूर पोलिसांचा खुलासा

फोन करणारा जयेश कंठा हा कुख्यात गुंड आणि खुनाचा आरोपी असून तो कर्नाटकातील बेळगावी कारागृहात बंद आहे.

Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

Nitin Gadkari Threat Calls: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कर्नाटकातील तुरुंगातून धमकीचे फोन (Threat Calls) आले होते. नितीन गडकरी यांना गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात आलेल्या धमकीच्या कॉल्ससंदर्भात नागपूर पोलिसांनी शनिवारी कॉलरचा शोध घेतला. पोलिसांनी सांगितले की, फोन करणार्‍याचे नाव जेलमधील दोषी जयेश कांता असे असून तो बेळगावी तुरुंगात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमकावण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. फोन करणारा जयेश कंठा हा कुख्यात गुंड आणि खुनाचा आरोपी असून तो कर्नाटकातील बेळगावी कारागृहात बंद आहे. कारागृहात बेकायदेशीरपणे फोन वापरून त्याने गडकरींच्या कार्यालयाला धमकावले. पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाल्याचे नागपूर पोलिस आयुक्तांनी सांगितले. कारागृह प्रशासनाने आरोपींकडून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. (हेही वाचा -Nitin Gadkari Received Death Threats: नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी; कार्यालयात दोनदा आला धमक्यांचा फोन)

गडकरींच्या कार्यालयात आला तीन वेळा धमकी फोन -

नागपूर पोलिसांनी आरोपी गुंडाच्या प्रॉडक्शन रिमांडची मागणी केली आहे. या धमकीच्या कॉलनंतर नागपूर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याभोवती सुरक्षा वाढवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल नेटवर्कच्या नोंदणीकृत क्रमांकावरून गडकरींच्या कार्यालयाच्या लँडलाइन क्रमांकावर सकाळी 11.25, 11.32 आणि दुपारी 12.32 वाजता तीन कॉल आले. कॉल रेकॉर्ड मिळवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, गडकरींना तीन फोन कॉल्सद्वारे धमकी देण्यात आली होती. ते म्हणाले की आमची गुन्हे शाखा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) वर काम करेल. विश्लेषण सुरू असून मंत्र्यांची सध्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.