'निसर्ग 'चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर पालघर येथील समुद्र किनापरट्टीलगतच्या 13 गावांमधील नागरिकांना NDRF कडून हलवण्यात येणार
त्यामुळे राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या उत्तरेच्या क्षेत्रात निसर्ग चक्रीवादळ 3 जूनला धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकूण 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर पालघर मध्ये सुद्धा निसर्ग चक्रीवादळाचा धोका उद्भवणार असल्याने तेथे एनडीआरफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर समुद्र किनारपट्टीलगच्या 13 गावांतील स्थानिकांना एनडीआरएफच्या जवानांकडून सुरक्षास्थळी हलवण्यात येणार आहे. तसेच स्थानिकांना दुसऱ्या जागी हलवताना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन सुद्धा करण्यात येणार असल्याचे एनडीआरएफ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई येथे बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात)
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या भागात निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळ 3 जून म्हणजे उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत -3, राजगड- 4, पालघर- 2, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबईत प्रत्येकी एक अशा संपूर्ण महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.(Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज; 'अशी' केली आहे तयारी, वाचा सविस्तर)
दरम्यान, या वादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा करून या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अलिबाग येथे ही 3 जूनला दुपारच्या वेळी 100-110 kmph वेगाने चक्रीवादळ जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती ओळखूनच विश्वास ठेवा अफावणा बळी पडून घाबरून जाऊ नका.