Nisarga Cyclone Landfall: निसर्ग चक्रीवादळ लॅन्डफॉलला सुरूवात; रायगड, ठाणे, मुंबई मध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे!
दरम्यान ही स्थिती पुढील 3 तास किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या नोर्थ ईस्ट भागाचा जमिनीवर प्रवेश करण्यास सुरूवात झाली आहे.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकलं आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीजवळ निसर्ग चक्रीवादळ आलं आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळ लॅन्डफॉलला सुरूवात झाली आहे. दरम्यान ही स्थिती पुढील 3 तास किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या नोर्थ ईस्ट भागाचा जमिनीवर प्रवेश करण्यास सुरूवात झाली आहे. सध्या यामुळेच रत्नागिरी, अलिबाग, पासून किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे भागातही त्याचा परिणाम दिसणार आहे.
दरम्यान चक्रीवादळाच्या या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पाऊस बरसणार आहे. मुंबई कुलाबा भागात 72 KMPH इतका वार्याचा वेग दुपारी 12.30 च्या सुमारास नोंदवण्यात आला आहे. मुंबई महानगर पालिका या वादळासाठी सज्ज आहे. दरम्यान मुंबईत कोळीवाड्यांमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे.
IMD Tweet
मुंबईमध्ये पाऊस आणि वारा
अलिबागमध्ये जोरदार वारा आणि पावसाचा हाहाकार
इथे पहा वादळाचा प्रवास
लॅन्डफॉलची सुरूवात झाल्यानंतर अलिबागमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वार्याचा वेग देखील वढला आहे. रेवदांडा भागात तुफान पावसाला सुरूवात झाली आहे. 120 kmph वेगाने वारे वाहत आहेत. प्राथमिक माहितीनुसार रायगड मध्ये दिवे आगार भागात लॅन्डफॉल झाल्याची माहिती आहे. पुढील काही तास नागरिकांनी घरीच रहावं रात्री 12 पर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.