IPL Auction 2025 Live

मंत्रिपद मिळवण्यासाठी मातोश्रीवर पाठवावा लागतो पैसा?; निलेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

‘जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार... यालाच म्हणतात उद्धव ठाकरे.’ असे हे ट्विट आहे

निलेश राणे (Photo Credit : Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. निवडणूक निकाल हाती आल्यानंतर देशात चर्चा चालली होती ती नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल याची. महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्या युतीने चांगली कामगिरी केल्याने शिवसेनेच्या वाट्याला एक तरी मंत्रीपद येईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र दुसरीकडे राजकीय गोटात चर्चा सुरु आहे ती निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या एका ट्विटची.

मंत्रीपदावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार... यालाच म्हणतात उद्धव ठाकरे.’ असे हे ट्विट आहे. त्यामुळे मुंबईचे खासदार अरविंद सावंत मातोश्रीवर नक्की किती पैसा पाठवत असतील अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान आजच्या शपथविधीत 65 खासदार केंद्रीयमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश आहे. (हेही वाचा: शिवसेना खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रिपदाची शपथ; संजय राऊत यांची माहिती)

शिवसेनेकडून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने, यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी नाराज झाल्या आहेत. सलग पाचव्यांदा त्या खासदार आहेत, त्यामुळे त्यांच्या ऐवजी सावंत यांची वर्णी लागल्याने त्या आजच्या शपथसोहळ्यास अनुपस्थित आहेत.