Coronavirus Lockdown मुळे औरंगाबाद येथे मुस्लिम कपलने व्हिडिओ कॉलवरच उरकला 'निकाह' (Watch Video)

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार ठप्प करण्यात आले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे इतर नुकसानासोबतच वैयक्तिक प्लॅन्सही फिसकटले. मात्र अहमदनगर येथील एका कपलने यावर एक अनोखा उपाय शोधला. त्यांनी चक्क व्हिडिओ कॉलवर निकाह केला.

'Nikah' of a couple was performed through video call (Photo Credits: ANI)

संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात दाखल झाल्यानंतर हळूहळू त्याचा प्रभाव वाढताना दिसत आहे. मात्र धोक्याची घंटा वेळीच ऐकून भारत देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार ठप्प करण्यात आले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे इतर नुकसानासोबतच वैयक्तिक प्लॅन्सही फिसकटले. अनेकांनी आपले लग्नसभारंभ, साखरपुडा यांसारखे कार्यक्रम पुढे ढकलले. मात्र औरंगाबाद (Aurangabad) येथील एका कपलने यावर एक अनोखा उपाय शोधला. त्यांनी चक्क व्हिडिओ कॉलवर (Video Call) निकाह केला. काल (शुक्रवार, 3 एप्रिल) व्हिडिओ कॉलवर यांचा निकाह पार पडला.

लॉकडाऊन काळात लग्नाची तारीख येत असल्याने गर्दी टाळण्यासाठी त्यांनी हा हटके पर्याय निवडला. व्हिडिओ कॉलवर निकाह केल्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन टळलेच आणि निकाह देखील ठरलेल्या वेळेत उरकता आला. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अनेकांनी आपले घरगुती कार्यक्रम, कौटुंबिक सोहळे, लग्नसोहळे रद्द केले आहेत. (मुंबई, पुणे, सांगली, नागपूर, अहमदनगर यांसह राज्यातील इतर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या किती? घ्या जाणून)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्य, केंद्र सरकारसह आरोग्य यंत्रणा, पोलिस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकही सुजाणता दाखवत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र काही ठिकाणी अद्यापही लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now