NIA Raid: मुंबई आणि पुणे येथे NIA ची छापेमारी, काही लोक ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन कारवाई

NIA ने 28 जून रोजी नागपाडा येथील एका रहिवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएला संशय आला की, त्यांच्या आणखी जण संपर्कात आहेत आणि त्यानुसार छापे टाकले.

NIA Raid: मुंबई आणि पुणे येथे NIA ची छापेमारी, काही लोक ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन कारवाई
NIA | (Photo Credits: Twitte/ANI)

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयए (NIA) महाराष्ट्रात छापेमारी सुरु आहे. दहशतवादी कारवायांच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. NIA ने ISIS च्या संपर्कात असलेल्या नागपाडा रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. एनआयएने मुंबई, भिवंडी, पुणे या ठिकाणी छापे टाकले आहेत. (हेही वाचा - Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या आमदारांची फसवणूक करून स्वाक्षरी करण्यात आली, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आरोप)

NIA ने 28 जून रोजी नागपाडा येथील एका रहिवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयएला संशय आला की, त्यांच्या आणखी जण संपर्कात आहेत आणि त्यानुसार छापे टाकले. एनआयएने मुंबईतील दोन , भिवंडीतील पडघा येथे दोन आणि एक पुण्यात छापा टाकला आहे.  मुंबईसह पुण्यात एनआयए (NIA) कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होती, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.

पुण्यात एनआयए आणि आयबीची छापेमारी सुरु आहे. NIA आणि IB च्या पथकाकडून कोंढव्यात छापे टाकण्यात आले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये NIA आणि IB पथकाकडून छापेमारी करण्यात आली.

(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2023 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).