Umesh Kolhe Murder: नुपुर शर्मांचं समर्थन केल्यामुळेचं अमरावतीच्या उमेश कोल्हेची हत्या, NIAचा आरोपपत्रात दावा

एनआयए कडून गेल्या आठवड्यात उमेश कोल्हे हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

NIA | (Photo Credits: twitter)

गेल्या काही महिन्यांपूर्वी अमरावती शहरातील उमेश कोल्हे हत्याकांड जोरदार गाजलं होत.अमरावती पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत होती. पण धार्मिक वादावरुन हे प्रकरण अधिक चिघळल्याने खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणाची दखल घेतली असुन उमेस कोल्हे प्रकरणाचा तपास एनआयए कडे सोपवला आणि त्यानंतर एनआयए या प्रकरणाचा खोलवर तपास करु लागली. साधरण सप्टेंबर महिन्याच्या मध्यात हे प्रकरण एनआयए कडे सोपवण्यात आलं. पण संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करत आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयए कडून नव्वद दिवस म्हणजे तिन महिन्यांचा कालावधी मागण्यात आला होता. तरी या मुदतीनुसार एनआयए कडून गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे.

 

एनआयए कडून दाखल करण्यात आलेलं हे आरोपपत्र १३७ पानांचा असुन यांत एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एनआयए कडून गेल्या तीन महिन्यात 11 जणांना अटक करण्यात आली असून अजूनही दोन आरोपी फरार असल्याचं मत आहे. उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच झाल्याचा दावा एनआयएनं आपल्या आरोपपत्रातून केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या हे एक दहशतवादी कृत्य असल्याचं एनआयएनं आपल्या आरोपपत्रात नमूद आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय एकात्मता बिघडली. केवळ अमरावतीच नव्हे तर संपूर्ण देशाती सर्वसामान्य जनतेची सुरक्षा देखील धोक्यात आल्याचा दावा एनआयएने या सादर केलेल्या आरोपपत्रातून केला आहे. (हे ही वाचा:- Umesh Kolhe Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंध, एनआयएचा मोठा खुलासा)

 

अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनाl काही सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्याच्या रागातूनच उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी केल्याचा आरोप होता. पण एनआयए च्या तपासानंतर हे चित्र आणखीचं स्पष्ट झालं असुन याबाबत दावा करत एनआयएने आरोपपत्रचं दाखलं केलं आहे.