Beed News: बीड मध्ये शिक्षकाची आत्महत्या, काही जण धमकी देत असल्याने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Beed News: बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथील खासगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षकाने व्हाट्सअॅपवर स्टेटश (Status)  ठेवला होता. काही जण त्यांनी धमकी देत होती त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश पवार असं या आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.  मोबाईलवर स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. पोलीस चौकशी केल्यानंतर आत्महत्येपूर्वी मोबाईलवर स्टेटस ठेवल्याचे कारण स्पष्ट केल होतं."पाच जण मला काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत असून दहा लाख रुपयांची मागणी करत आहेत, यापूर्वी मी त्यांना पाच लाख रुपये दिले आहेत. तरीही आता या पाच जणांकडून पैसे न दिल्यास माझ्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे." अंकूशचा हा स्टेटश पाहून त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला धक्का बसला.

या प्रकरणात अंकुशने बीडच्या एका शेतात जावून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलीसांनी घटनास्थळावरून अंकुशला ताब्यात घेतले त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले. पोलीस या घटनेअंतर्गत तपासणी करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif