New Year Gift for Liquor Lovers: मद्यप्रेमींसाठी नववर्षाची भेट; 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 पर्यंत सुरु राहणार बार

महसूल विभागाच्या पत्रकानुसार येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला परवाना धारक बार (New Year Gift for Liquor Lovers) पहाटे पाचपर्यंत सुरु असणार आहेत

New Year Celebration | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

नाताळ (Christmas 2022) आणि नववर्षाचे स्वागत (New Year Celebration 2023) करण्याचा तुम्ही जर जंगी बेत आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पण, जर तुम्ही मद्यप्रेमी असाल तरच. होय, शेवटच्या वर्षातील विकेंड, त्यातच येणारा ख्रिसमस (Christmas Celebration 2022) आणि त्याच्याच पुढच्या आठवड्यात आलेले नववर्ष. अशा वेळी पार्टी करण्याचा अनेकांचा मानस असतो. त्यातही मद्यप्रेमींच्या आनंदाला विशेष भरते येते. त्यामुळे राज्याच्या महसूल विभागाने खास पत्रक काढून मद्यप्रेमींना नववर्षाची खास भेट दिली आहे. महसूल विभागाच्या पत्रकानुसार येत्या 24, 25 आणि 31 डिसेंबरला परवाना धारक बार (New Year Gift for Liquor Lovers) पहाटे पाचपर्यंत सुरु असणार आहेत.

राज्याच्या महसूल विभागाच्या पत्रकाचा हवाला देत एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात राज्यातील बार 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटे पाचपर्यंत सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेली सवलत म्हणजे राज्याती मद्यप्रेमींसाठी जणू काही पर्वणीच असणार आहे. अर्थात, राज्य सरकार ही परवानी उगीच देत नाही. तर त्यापाठीमागे महसूल मिळविण्याचेही गणीत आहे. राज्य सरकारला मद्यविक्रीवर लागणाऱ्या कराच्या रुपात मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. त्यामुळे राज्यावर असलेला कर्जाचा बोजा पाहता महसूल मिळविण्याची एकही संधी सरकार सोडत नसल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Kharmas 2022: खरमास म्हणजे काय? तो कधीपासून सुरू होतो? या काळात काय करावे? काय करू नये? जाणून घ्या)

दरम्यान, जगभरात प्रामुख्याने चीनमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. त्यामुळे भारतातही कोरोना व्हायरस संक्रमणाची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार जपून पावले टाकत आहेत. कोरोना महामारीचा पुनर्रप्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच उपाययोजनांचा भाग म्हणून गर्दी टाळण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना चेहऱ्यावर मास्क लावण्याचे अवानह केले जात आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्येही मास्क लावण्याचे अवाहन करण्यात आले आहे.