Mumbai New Year Celebration: मुंबईत नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे व्यापाऱ्यांची दिवाळी; शहरात 900 कोटींची उलाढाल

तसेच बाहेरगावी, हॉटेल किंवा रेस्तरांमधून जाऊन नववर्ष स्वागत करण्याऐवजी घरोघरी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मेजवान्यांचे आयोजन अधिक दिसले.

New Year Celebration (PC - Pixabay)

मुंबईत (Mumbau) सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात (New Year Celebration) स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या वेळी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. यामुळे व्यापाऱ्यांची चांदी झाली. मुंबईतील नववर्ष स्वागताचा बाजार हा सुमारे 900 कोटी रुपयांचा असल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) म्हटले आहे. या निमित्ताने विविध माध्यमांतून झालेल्या खरेदीमुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. नववर्षाच्या निम्मीत्ताने विविध माध्यमांतून झालेल्या खरेदीमुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. (Happy New Year 2024: नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची शिर्डीच्या साई मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी (Watch Video))

नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्त ठिकठिकाणी सणांसारखे वातावरण असते. त्यानिमित्ताने घरांमध्ये सजावट केली जाते, विविध वस्तूंची खरेदी होते. लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छापत्रे दिली जातात. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते, त्यासाठी खर्च केला जातो. यानिमित्ताने यंदा बाजारात चांगली उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.

यंदा नवीन कपड्यांची खरेदी अधिक प्रमाणात झालेली दिसली. तसेच बाहेरगावी, हॉटेल किंवा रेस्तरांमधून जाऊन नववर्ष स्वागत करण्याऐवजी घरोघरी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मेजवान्यांचे आयोजन अधिक दिसले. त्यामुळे घरोघरी पार्टीसाठी विविध प्रकारची खरेदी करण्याकडे लोकांचा कल अधिक होता.