Petrol-Diesel Price Today: पेट्रोल, डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणनु घ्या तुमच्या शहरातील दर
WTI क्रूडच्या किमती 0.72 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 73.26 वर व्यापार करत आहेत. तथापि, ब्रेंट क्रूडची किंमत 0.41 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 76.45 वर पोहोचली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी आज इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रतिलिटर आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 94.14 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. WTI क्रूडच्या किमती 0.72 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 73.26 वर व्यापार करत आहेत. तथापि, ब्रेंट क्रूडची किंमत 0.41 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 76.45 वर पोहोचली.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत
राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रतिलिटर आहे, तर एक लिटर डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 91.43 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे. पटनामध्ये पेट्रोलची किंमत 105.92 प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 91.09 आहे. (हे ही वाचा Bank Of India मध्ये स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 7 जानेवारी पर्यंत करता येईल अर्ज.)
देशातील प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 | 94.14 |
दिल्ली | 95.41 | 86.67 |
चेन्नई | 101.40 | 91.43 |
कोलकाता | 104.67 | 89.79 |
पाटणा | 105.92 | 91.09 |
याप्रमाणे दर तपासा
इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). त्याचप्रमाणे, BPCL ग्राहक त्यांच्या मोबाईलवरून RSP टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकतात. HPCL ग्राहक 9222201122 वर HPPprice टाइप करून SMS पाठवू शकतात.
दररोज सकाळी 6 वाजता दर बदलतात
आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाची सरासरी किंमत आणि परकीय चलन दर यांच्या आधारावर तेल कंपन्या गेल्या १५ दिवसांत दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारतात. इंडियन ऑइल सारख्या तेल विपणन कंपन्यांद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचे दररोज बद्दल केले जाते, आणि कोणतीही सुधारणा सकाळी 6 वाजल्यापासून लागू केली जाते.