सरकारी कार्यालयात T-Shirt, Jeans Pant परिधान न करण्याच्या नियमांवरुन Beed मध्ये नव्या वादाला पडली ठिणगी, Magmo Sanghatna उठवणार आवाज
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे (Suresh Sable) यांनी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या गणवेशात कार्यालयात यावे, टी-शर्ट, जीन्स पॅन्ट परिधान करू नये, अन्यथा अचानक भेटीत आढळल्यास कारवाईला सामोरे जावे, असे आदेश जारी केले आहेत.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या धाडसी कारवाईमुळे चर्चेत राहणारे तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आता राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांची सततची भीती आता आरोग्य विभागातही दिसून येत आहे.
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे (Suresh Sable) यांनी कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या गणवेशात कार्यालयात यावे, टी-शर्ट, जीन्स पॅन्ट परिधान करू नये, अन्यथा अचानक भेटीत आढळल्यास कारवाईला सामोरे जावे, असे आदेश जारी केले आहेत. बीडचे भूमिपुत्र तुकाराम मुंढे यांचा स्वभाव शिस्तप्रिय असून बीड हा त्यांचा जिल्हा असल्याने ते कोणत्याही आरोग्य संस्थेला कधीही भेट देऊ शकतात. असे गृहीत धरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहे.
दरम्यान डॉ.सुरेश साबळे यांनी आदेश जारी केला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी टी-शर्ट, जीन्स पॅन्ट घालून कार्यालयात येऊ नये, तर गणवेशात यावे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असताना ऍप्रन घालावे. नेमून दिलेले काम वेळेत करावे, रुग्णालयांची माहिती अद्ययावत ठेवावी, रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. मात्र आता यावर वाद निर्माण झाला आहे. आदेश स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे सांगत मॅग्मो संघटना आवाज उठवणार आहे. मॅग्मोचे कार्याध्यक्ष डॉ.नितीन मोरे यांनी इशारा दिला आहे.
तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तुकाराम मुंढे हे अतिशय शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात, त्या विभागात ते आपल्या शिस्तीने कामाची छाप पाडतात, अशी माहिती आहे. तुकाराम मुंढे यांची तीच प्रतिमा नवीन पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे. हेही वाचा Prakash Ambedkar Statement: लोकसेवक म्हणून सत्ता चालवणारे लोक हुकूमशहासारखे वागत आहेत, प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वरिष्ठ डॉक्टरांकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील आळंदी वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकण्यात आला आहे. रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टर उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली. मात्र, या ठिकाणी डॉक्टरच उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कारवाई टळली.