NetBanking: कोल्हापूर येथील धान्य व्यापाऱ्याला भामट्याकडून 10 लाखाचा गंडा; नेट बँकींग महागात

कोल्हापूर येथील एका व्यापाऱ्याला एका भामट्याने तब्बल10 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हल्दीराम फूड्स लिमिटेड इंटरनॅशनल कंपीनी उत्पादनांची डिस्ट्रिब्युटरशीप देण्याचे अमिश दाखवत या भामट्याने कोल्हापूर येथील एका धान्य व्यापाऱ्याशी जवळीक वाढवली. त्याचा विश्वास संपादन करत नेट बँकींग (Net Banking) द्वारे व्यवहार करत फसवणूक केली.

Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोल्हापूर (Kolhapur) येथील एका व्यापाऱ्याला एका भामट्याने तब्बल10 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हल्दीराम फूड्स लिमिटेड इंटरनॅशनल कंपीनी उत्पादनांची (Haldiram Foods International Limited) डिस्ट्रिब्युटरशीप देण्याचे अमिश दाखवत या भामट्याने कोल्हापूर (Kolhapur) येथील एका धान्य व्यापाऱ्याशी (Grain Trader) जवळीक वाढवली. त्याचा विश्वास संपादन करत नेट बँकींग (Net Banking) द्वारे व्यवहार करत फसवणूक केली. फसवणूक झालेले व्यापारी प्रकाशलाल मोहनलाल माखिजानी (वय ५०, रा. कारंडे मळा, कदमवाडी ) यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

व्यापारी प्रकाशलाल मोहनलाल माखिजानी यांचा कोल्हापूर येथील मार्केट यार्ड येथे केमसन्स ट्रेडर्स नावाचे धान्य विक्रीचे होलसेल दुकान आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोनद्वारे संपर्क साधला. फोनवर त्याने आपण हलदीराम फूडस लिमिटेड इंटरनॅशनल कंपनीतून बोलत असल्याची ओळख सांगितली. कंपनी कोल्हापूरमध्ये डिस्ट्रिब्युटर शोधत आहे. आपण आमच्या निकशांमध्ये बसता त्यामुळे कंपनी द्वारे आम्ही आपल्याशी संपर्क साधत असल्याचे सांगत या भामट्याने मोहनलाल माखिजानी यांचा विश्वास संपादन केला. (हेही वाचा, मुंबईत महिलेची Matrimonial Site वर Indian Navy Captain असल्याचं सांगत 6.25 लाखांची फसवणूक)

मोहनलाल माखिजानी यांनीही अज्ञात भामट्यावर विश्वास ठेवत व्यवहार निश्चित केला. या भामट्यानेक माखिजानी यांना कंपनी रजिस्ट्रेशन, सिक्युरिटी अॅग्रीमेंट, मटेरियल ऑर्डर आदींसाठी त्यांच्या बँक अकाऊंटवरुन आरोपीने सूचवलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर 10,25,000 ( दहा लाख पंचवीस हजार) रुपये नेट बँकींगच्या माध्यमातून वळते केले. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर माखिजानी यांनी संबंधितास माल पाठविण्यास सांगितले. यावर संशयिताने माल आणि डिस्ट्रिब्युरशीप न देता इन्शुरन्सकरिता तीन लाखाची आगाऊ मागणी केली. आगोदरच्या संवादात याबाबत कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहनलाल माखिजानी यांनी थेट शाहुपुरी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रर दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now