Nepal Tara Air Plane Crash: नेपाळच्या 'तारा कंपनी' विमानदुर्घटनेत ठाण्यातील 4 जण बेपत्ता; 2 मुलांचा समावेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपाठी कुटुंबिय मुक्तिधाम मंदिरात भेटीसाठी गेले होते.

Plane Crash | PC: Twitter/ANI

नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये (Nepal Plane Crash) ठाणे जिल्ह्यातील 2 मुलं आणि त्यांचे पालक बेपत्ता आहेत. दरम्यान नेपाळच्या 'तारा एअर’ ( Tara Air) कंपनीचे विमान कोसळल्याची दुर्घटना काल 29 मे दिवशी समोर आली आहे. खराब वातावरणामुळे काल शोधमोहिम आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता पण आज या कामाला वेग आला आहे. ठाण्याच्या बेपत्ता कुटुंबियांच्या नातेवाईकांना भारतीय दूतावासासोबत संपर्कात ठेवण्याचं काम सुरू आहे.

'तारा एअर’चं विमान काल टेक ऑफनंतर हिमालयातून उड्डाण करताना कोसळलं. या विमानाने पोखरा मधून टेक ऑफ केले होते. यामध्ये 22 प्रवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी चारजण ठाण्यातील आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्यांमध्ये अशोक कुमार त्रिपाठी, त्यांच्या पत्नी वैभवी त्रिपाठी आणि मुलं धनुष वा रितिका यांचा समावेश आहे.

विमानात असलेल्या या ठाण्याच्या 4 जणांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी नेपाळच्या भारतीय दुतावासाने मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आहे. वैभवी बांदेकर (त्रिपाठी) यांच्या पासपोर्ट वर बोरिवलीच्या चिकूवाडी परिसरातील पत्ता आहे. Nepal Plane Crash: नेपाळी लष्कराला मोठे यश, 22 जणांना घेऊन गेलेल्या विमानाचे अवशेष सापडले; मृतदेहांचा शोध सुरू .

मुंबई पोलिस बोरिवलीच्या फ्लॅटमध्ये गेले असताना त्यांना फ्लॅट बंद आढळला. शेजारच्यांनी त्रिपाठी कुटुंब नुकतच ठाण्याला शिफ्ट झाल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी ठाण्यात शोधाशोध सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपाठी कुटुंबिय मुक्तिधाम मंदिरात भेटीसाठी गेले होते.