Maharashtra SIR Deadline जवळ येतेय, 1.87 कोटी मतदारांची नोंद 'अनुपलब्ध' प्रवर्गात; 17ऑगस्ट पूर्वी भरा अर्ज
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, यामध्ये गैरहजर, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंदणी झालेल्या आणि इतर प्रवर्गातील मतदारांची सविस्तर आकडेवारी देण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेसंदर्भात १३ ऑगस्ट २०२६ रोजी एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी भेटी देऊन गणना प्रत्र भरून घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ रोजी संपणार आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ इतके मतदार असून, यापैकी आजमितीस ७ कोटी ६२ लाख ९९ हजार ३६० (७७.९७%) मतदारांचे गणना प्रत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहेत. मात्र, अद्याप १ कोटी ८७ लाख ५६ हजार २३१ (१९.१७%) इतक्या मतदारांचे गणना प्रत्र जमा होऊ शकलेले नाहीत, ज्यांना "गणना प्रत्र जमा न होणे" (Uncollectable EF) या प्रवर्गात नोंदवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ९ कोटी ५० लाख ५५ हजार ५९१ (९७.१४%) मतदारांबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे, तर उर्वरित २७ लाख ९८ हजार ४५८ (२.८६%) मतदारांबाबतची कार्यवाही अद्याप बाकी आहे.
सापडु न शकलेले /गैरहजर (Absent), कायमस्वरुपी स्थलांतरीत (Permanently Shifted), मृत (Dead), अन्यत्र नोंदणी केलेले (Already Enrolled) व इतर (Other) या गटातील मतदारांविषयी प्रसिध्दीपत्रक pic.twitter.com/zrZ9ZTuQKj
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) August 13, 2026
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती उपलब्ध
"ब" गटातील अनुपलब्ध गणना प्रत्रासंबंधित मतदारांच्या नावांबाबत मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) संबंधित राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींकडून (बीएलए) उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरही ही यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तसेच, ज्या मतदारांच्या वास्तव्याच्या पत्त्याबाबत माहिती आवश्यक आहे, अशा मतदारांची माहिती संबंधित बीएलओंना उपलब्ध करून देण्यासाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. गणना प्रत्र भरण्याची मुदत १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत असल्याने, या मुदतीत पडताळणी करून संबंधित माहिती बीएलओंना उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2026 06:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

