Supriya Sule on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान करणे दुर्दैवी- सुप्रिया सुळे

त्यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

Supriya Sule | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना पसरवणारे राज्य असा जो महाराष्ट्राचा उल्लेख केला तो ऐकून प्रचंड वेदणा झाल्या. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे. खरे तर पंतप्रधान महागाई, चीन, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर बोलतील म्हणून आम्ही आपेक्षेने त्यांच्या भाषणाकडे पाहात होतो. मात्र, त्यांनी महाराष्ट्राबद्दल अनपेक्षीत वक्तव्य केले. ते महाराष्ट्राबद्दल असे का बोलले त्याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटले. व्यक्तीशाहा मला फार वेदना झाल्या, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान हे केवळ कोणा एका पक्षाचे नसतात. ते केवळ भाजपचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे असतात. असे असताना एखाद्या राज्याबद्दल पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राने भाजपला 18 खासदार दिले आहेत. या सर्व खासदार आणि महाराष्ट्रातील जनतेचा, मतदारांचा अपमान आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. (हेही वाचा, Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पलटवार; महाराष्ट्र सरकारने उत्तर देण्याबाबत अवाहन)

महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवणारे राज्य म्हणून आरोप करताना केंद्र सरकारने किमान डेटा तरी तपासायला हवा होता. महाराष्ट्र एसटी, टेम्पो, ट्रक अशी रस्ते वाहतूक पुरवू शकतो. कोरोना काळात सर्वधिक श्रमीक ट्रेन गुजरात राज्यातून धावल्या. श्रमिक ट्रेन या केंद्र सरकारनेच पुरवल्या होत्या. त्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री पियूश गोयल, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली त्या वेळची ट्विट पाहा. कोणत्या राज्याला किती ट्रेन मिळाल्या. महाराष्ट्राला किती ट्रेन मिळाल्या हे त्यावेळी अभिमानाने सांगत होते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.