Rohit Pawar on Devendra Fadnavis: पेट्रोल दरवाढीवरील देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरु आहे. यावरुन केंद्र आणि राज्य यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगत आहे. पेट्रोल दरवाढीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Rohit Pawar on Devendra Fadnavis: पेट्रोल दरवाढीवरील देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर
Devendra Fadnavis & Rohit Pawar (Photo Credits: Twitter)

देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरु आहे. यावरुन केंद्र आणि राज्य यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगत आहे. पेट्रोल दरवाढीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे," असा टोला लगावत वस्तूस्थिती सांगणारा एक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. तसंच जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये लिहितात, "खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही."

"केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रु मिळत असल्याचे सांगतात. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही," असंही पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रोहित पवार ट्विट्स:

रोहित पवार यांनी साफ खोटं आणि वस्तुस्थिती अशा दोन बाजू मांडणारा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात. पेट्रोल 30 रुपयांत आपल्याला मिळतं. त्यावर प्रोसेसिंग आणि इतर चार्जेस 32 रुपये लावले जातात. त्यापैकी 12 रुपये राज्य सरकारला मिळतात. त्यावर राज्य सरकार 30 रुपये लावतं म्हणजेच 100 रुपये लीटर पेट्रोल असेल तर त्यापैकी 42 रुपये राज्याला मिळतात. हे साफ खोटं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 10, 2021 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).