राजकीय मतभेद विसरून आमदार रोहित पवार यांनी केलं अमित ठाकरे यांचं मनसे नेतेपदाच्या जबाबदारीसाठी अभिनंदन; सोबत व्यक्त केला 'हा' आशावाद!
एनसीपी आमदार आणि शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनीदेखील अमितला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मनसेकडून नव्या राजकीय झेंड्याच्या अनावरण आणि त्यासोबतच अमित ठाकरेचं राजकीय लॉन्चिंग झाले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलावर म्हणजेच अमित ठाकरे वर मनसे नेतेपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. दरम्यान या घोषणेनंतर अमित ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एनसीपी आमदार आणि शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनीदेखील अमितला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. अमित ठाकरे यांंची मनसेच्या नेते पदी निवड; महाअधिवेशनामध्ये मांडला पहिला ठराव.
रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा देताना.'‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील.' अशा भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घ्या अमित ठाकरे यांच्याबद्दल खास गोष्टी .
रोहित पवार यांचे ट्वीट
रोहित पवार सध्या अमित ठाकरेंचे चुलत बंधू आदित्य ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत आहेत. सध्या महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराण्यांमधील युवा आमदार आहेत. भविष्यात महाराष्ट्र राज्यासाठी राजकीय भेद विसरून राज्याच्या हितासाठी एकत्र येऊन काम करायला आवडेल असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.