मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही; जितेंद्र आव्हाड यांचे गणेश नाईक यांना प्रत्युत्तर
'मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना 'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक' अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. 'मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना 'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक' अशा फिल्मी स्टाइलमध्ये उत्तर दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सध्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यावर गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांना उत्तर दिलं आहे. 'तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक,' असं उत्तर नाईक यांनी दिलं होतं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो, अशी टीका आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे. (हेही वाचा - पुण्यात कोरोना व्हायरसचे आणखी 3 रुग्ण; शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहचली)
गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला दुःख नाही वाटतं. कारण, माझा एकचं बाप आहे. गणेश नाईक यांनी सतत बाप बदलले आहेत. नाईक यांनी 90 ला एक बाप, 2000 दुसरा तर, 2020 ला तिसरा बाप बदलला. माझी बाप बदलणाऱ्यांची औलाद नाही. माझा मरेपर्यंत एकचं बाप आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.