Eknath Khadse Criticizes Devendra Fandnavis: ज्येष्ठ म्हणायचे आणि मागून खंजीर खुपसायचा; एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

तसेच राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहेत.

Eknath Khadse AND Devendra Fandnavis (Photo Credit: PTI)

भाजपाला रामराम केल्यानंतर अखेर आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांविरोधात आक्रमक भुमिका घेताना दिसले आहेत. दरम्यान, ते म्हणाले की, मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. जेष्ठ म्हणायचे आणि मागून खंजीर खुपसायचा, अशा शब्दात त्यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच मी गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपची सेवा करत आलो आहे, त्याबदल्यात पक्षाने मला काय दिले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपमध्ये कार्यरत असताना आपल्याला कशी वागणूक मिळाली? हे देखील खडसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. एवढेच नव्हेतर, मला राजकीय जीवनातून घरी बसण्याचीच तयारी त्यांनी केली होती. यामुळे गेल्या विधानसभा निवडणूकीत मला तिकिटदेखील देण्यात आले नाही. त्यावेळी तुम्ही जेष्ठ आहात आम्हाला मार्गदर्शन करा, असे सांगण्यात आले होते. ज्यांना भाजपमध्ये येऊन चार दिवस नाही झाली, असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटते आहे, असेही खडसे यांनी म्हटले आहे. तसेच पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी भाजपवर टीका केली आहे. मी राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता, तसाच मलाही राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे म्हणून मी राष्ट्रवादीत आलो, असेही ते म्हणाले आहेत. हे देखीला वाचा- एकनाथ खडसे यांचा NCP मध्ये प्रवेश झाला म्हणून राज्य मंत्रिमंडळामध्ये बदल होणार ? पहा खुद्द शरद पवार यावर काय म्हणाले

एकनाथ खडसे त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील त्यांचे समर्थकही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटले आहेत.