NCP Crisis: शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस- सूत्रांची माहिती

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे वृत्त आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच शरद पवार (Sharad Pawar) गटाला नोटीस पाठवल्याचे समजते.

Sharad Pawar vs Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्षात सुरु झालेला शिवसेना टाईप संघर्ष आता पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे वृत्त आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच शरद पवार (Sharad Pawar) गटाला नोटीस पाठवल्याचे समजते. अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अर्जावरुन निवडणूक आयोगाने ही नोटीस पवार गटाला पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडून मात्र या नोटीशीबाबत अधिकृत कोणताही माहिती देण्यात आली नाही.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकासआघाडीमध्ये एक घटकपक्ष होतील. राज्यात महाविकासआघाडीचे सरकारही होते. मात्र, शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत प्रवेश मिळवला. लगोलग निवडणूक आयोगानेही शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केले. अशीच काहीशी स्थिती पुढच्या काहीच दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आली. (हेही वाचा, Sharad Pawar Faction: शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीसा, घ्या जाणून)

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि थेट सत्तेत प्रवेश मिळवला. दरम्यान, अजित पवार यांच्या भूमिकेला पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा विरोध असल्याचे अद्यापपर्यंततरी दिसते आहे. त्यावरुनच अजित पवार यांनी बंडाचे निषाण फडकवल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, अद्यापही शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे नेकमे किती आमदार आहेत याबाबत निश्चित आकडा पुढे आला नाही. दरम्यान, दोन्ही बाजूंनी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आवश्यक पावले टाकली जात आहेत. त्यातूनच अजित पवार गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावरुन शरद पवार गटाला नोटीस मिळाल्याचे समजते.