आगामी लोकसभा निवडणुक शरद पवार लढवणार नाहीत?
राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2019) लढवणार नाही असे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2019) लढवणार नाही असे सांगितले जात आहे. याबबात खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्यावेळी जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक या बैठकीसाठी उपस्थितीत होते. तर आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय बैठक घेण्यात आली होती.(हेही वाचा-शरद पवार शकुनीमामा, प्रियांका गांधी म्हणजे तैमूर- पुनम महाजन)
मात्र एका चॅनलच्या माध्यमातून शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नाहीत असे सांगितले जात होते. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबात जोरदार चर्चा रंगू लागल्या आाहेत. तर जयंत पाटील यांनी बैठकीदरम्यान बाहेर येत शरद पवार निवडणुक लढवणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे राजकीय पक्षात याबाबात काय प्रतिक्रिया उमटतात ते आता पाहायला मिळणार आहे.