शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

तर दुपारच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले होते. शरद पवार यांच्या दिल्लीतील दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दुपारच्या विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले होते. शरद पवार यांच्या दिल्लीतील दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. विविध तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहेत. तर असे सुद्धा बोलले जात आहे की, केरळ मधील प्रमुख नेते शरद पवार यांना भेटणार आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या नेत्यांची शरद पवार भेट घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील राजकरणाच्या पडद्याआड अनेक घडामोडी होत आहेत. अशातच आता शरद पवार यांचा दिल्ली दौरा हा नेमका कोणत्या कारणासाठी आहे याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या शिष्टमंडळातील काही नेतेमंडळी सुद्धा उपस्थितीत होती. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात खासगी बैठक सुद्धा झाली.

राज्यातील महाविकास आघाडी मध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे वारंवार स्पष्टीकरण दिले जात होते. मात्र आजच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षाला कमकुवत करत असल्याचा दावा केला आहे. यामुळे नक्की महाविकास आघाडीमध्ये मतभेद असू शकतात अशी चर्चा जोर धरु लागली आहे. दुसऱ्या बाजूला आजच शरद पवार यांचा दिल्ली दौरा हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे राजकरणात नेमक काय खलबतं सुरु असू शकते याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे.(Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: अधिक तुटण्याआधी भाजपसोबत जुळवून घ्या, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुद्धा जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रीया सुळे यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमागील कारण सांगितले. त्या फक्त ऐवढ्याच म्हणाल्या की, प्रशांत किशोर यांना जेवणासाठी सिल्व्हर ओकवर बोलावण्यात आले होते. परंतु त्यांच्या भेटीवेळी मी तेथे उपस्थिती नसल्याने नेमके त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे माहिती नसल्याचे सुप्रीया सुळे यांनी स्पष्ट केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif