Naxal Attack In Gadchiroli: गडचिरोलीत पुन्हा जाळपोळ, नक्षलांनी पेटवली रस्ता बांधणीसाठीची वाहने

गडचिरोलीत संतापलेल्या नक्षलांनी रविवारी रात्री रस्ता बांधणीसाठी आणलेल्या उपकरणांना पेटवून दिले आहे.

Naxal Attack On Road Construction Site (Photo Credits: File Photo)

गडचिरोलीत (Gadchiroli)  नक्षलवाद्यांची कारवाई (Naxalite Movements)  दिवसेंदिवस आणखीनच आक्रमक स्वरूप धारण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) दिवशी गडचिरोलीत काही नक्षलवाद्यांनी जांभुरखेडा (Jambhurkheda) परिसरात जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यानंतर लगेचच जंगल परिसरात रस्ता किंवा पुलाची बांधणी करू नका अशी ताकीद सरकारला देणारे बॅनर्स संपूर्ण परिसरात लावण्यात आले, मात्र ही धमकी न जुमानता पंत प्रधान ग्राम सडक योजनेच्या (PM Gram Sadak Yojna)  अंतर्गत नक्षलवादी परिसरात रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले. यामुळे संतापलेल्या नक्षलांनी रविवारी रात्री रस्ता बांधणीसाठी आणलेला एक टँकर, दोन सिमेंट काँक्रीट मिक्सर, रोड रोलर व सेंट्रिंगच्या उपकरणांना चक्क आग लावली आहे.

एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील एमलीवरून मंगुठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा हादसा घडल्यावर कंत्राटदाराला लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. यवतमाळच्या शाम बाबा कंस्ट्रक्टशन कंपनीचे अनिल सेवदा यांच्याकडे या रस्त्याच्या बांधणीचे काम देण्यात आलेले होते, तसेच एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या मालकीची ही वाहने व इतर साहित्य नक्षलवाद्यांनी संतापात येऊन जाळून टाकल्याचे सकाळच्या वृत्तातून समोर येत आहे.

जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, बॅनर लावून नक्षलवाद्यांची धमकी; असा रचला हल्ल्याचा कट

मागील वर्षभरात नक्षलवादी हल्य्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत, सरकारी योजनांचा तीव्र विरोध करणारे नक्षलवादी पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नागरिकांवर देखील थेट हल्ले करत असल्याने एकंदरीतच भीतीचे वातावरण तयार झाले आहे.