Nawab Malik Tweet: 'अब चैन खोने का वक़्त आ गया है' नवाबे मलीक यांचे सूचक ट्विट; आजच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता

या ट्विटमध्ये त्यांनी 'त्यांची झोप उडाली आहे, आता चैनही गमावण्याची वेळ आली आहे. सकाळी 10 वाजता भेटू असे म्हटले आहे.'

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याच्या अटकेपासून सुरु झालेले आरोप-प्रत्यारोपनाट्य अद्यापही कायम आहे. हे प्रकरण आता नवाब मलिक (Nawab Malik) विरुद्ध समीर वानखेडे (Sameer Wankhede) पर्यायाने एनसीबी (NCB) असे राहिले नाही. हे प्रकरण आता नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपा असे झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल (9 नोव्हेंबर) केलेल्या आरोपाला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मलिक हे आज (10 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नवाब मलिक यांनी याबाबत एक सूचक ट्विटही (Nawab Malik Tweet) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'त्यांची झोप उडाली आहे, आता चैनही गमावण्याची वेळ आली आहे. सकाळी 10 वाजता भेटू असे म्हटले आहे.'

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक़्त आ गया है, मिलते है आज सुबह 10 बजे.'' नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच घेतलेल्या परिषदेत इशारा दिला होता. त्यांच्या बॉम्बचा आवाजच झाला नाही. उद्या आपण हायड्रॉजन बॉम्ब फोडणार आहोत, असा इसारा देत मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता निर्माण केली होती. त्यातच मलिक यांचे ट्विट आल्याने ते नेमका काय गौप्यस्फोट करतात याकडे राजकीय वर्तुळासह इतर वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उद्या उघड करणार; Nawab Malik यांचं प्रत्युत्तर देताना फडणवीसांचे 'फटाके' फुसके निघाल्याचं म्हणत उडवली खिल्ली)

'ट्विट'

'ट्विट'

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मेहुणी हर्षदा रेडकर यानी काल (9 नोव्हेंबर) नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हर्षदा रेडेकर यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. भारतीय दंड संहिता कलम 354, 354 (ड), 503 आणि 506 तसेच Indecent Representation of Women Act, 1986 अन्वये हर्षदा रेडकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.