COVID-19 च्या मृतदेहांच्या अंत्यविधीबाबत BMC कडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक नवाब मलिक यांच्या मागणीवरुन घेण्यात आले मागे
मात्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आयुक्तांना निवेदन केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे.
COVID 19 मुळे मृत्यू झाल्यास कोणत्याही धर्माच्या रुग्णाच्या शवाचे दहनच होणार असे आदेश BMC आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काही वेळापूर्वी दिले होते. मात्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आयुक्तांना निवेदन केल्यानंतर हे परिपत्रक मागे घेण्यात आले आहे. अशा प्रकारचे आदेश देणे म्हणजे त्या मृतदेहाच्या धर्माचा अवमान असल्याचे नवाब मलिक यांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे. प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांच्याशी नवाब मलिका यांची फोन वरुन सविस्तर चर्चा झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घेतले आहे.
मुंबईत 47 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोरोना ग्रस्तांची संख्या 170 गेली आहे. महाराष्ट्रात एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण मुंबईत आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे शव हे दहनच केले जाईल असे परिपत्रक मनपा आयुक्त प्रविण परदेशी यांनी प्रसिद्ध केले होते. मात्र हा त्या शवाच्या धर्माचा अपमान आहे, असे सांगत नवाब मलिक यांनी हे आदेश मागे घेण्यास सांगितले. या विषयावर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर हे आदेश आयुक्तांनी मागे घेतले आहेत. COVID 19 मुळे मृत्यू झाल्यास कोणत्याही धर्माच्या रुग्णाच्या शवाचे दहनच होणार; BMC आयुक्त प्रवीण परदेशी यांचे आदेश
पाहा नवाब मलिकांचे ट्विट:
'जर कोणी मृतदेहाचे दफन करण्याचा आग्रह धरला तर त्या मृतदेहाला मुंबई बाहेर नेल्यानंतरच परवानगी मिळेल' असे या परिपत्रकात प्रविण परदेशी यांनी म्हटले होते. नवाब मलिकांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत अनेक मुस्लिम, ख्रिस्ती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे असे करणे योग्य नाही.
काही दिवसांपूर्वी चीन मध्ये असे आदेश देण्यात आले होते की, कोविड-19 च्या मृतदेहाचे दफन न करता त्यावर अंत्यसंस्कार करावे. दफन केल्याने कोविड-19 चा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते.