Nawab Malik Slams BJP: नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कायदेशीर मान्यता

त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (Nawab Malik) पक्षाचे मानखूर्द विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अलीकडेच त्यांच्यावर 'दहशतवादी' असा आरोप केला होता. तसेच, इतरही भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांबद्द बोलताना म्हटले की, आपल्यावर होणारे सर्व आरोप हे बेजबाबदारपणाचे आहे. ज्या ज्या लोकांनी मला दहशतवादी संबोधले आहे त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करत आहे. त्यांना कोर्टात खेचत असल्याचेही म्हटले आहे. याच वेळी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar Faction) पक्षाचे आपण अधिकृत उमेदवार आहोत, असेही म्हटले.

नवाब मलिक यांनी एनटीव्हीशी बोलताना सांगितले की, 'माझा कधीही दहशतवादी किंवा गुन्हेगारांशी संबंध आलेला नाही. मी या देशातील राजकारणासाठी 50 वर्षे समर्पित केली आहेत. काहींना असे वाटते की, नसी दहशतावादी संबोधून ही विधाने मते आकर्षित करू शकतात. परंतु प्रत्यक्षात, त्यांचा उलट परिणाम होतो, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते दिसून येईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2024: महाविकासआघाडी आणि महायुती सोडवणार का बंडाचे ग्रहण? कुणाला विधानपरिषद, काहींना महामंडळाचे आमिष)

न्यायालयीन खटला आणि कायदेशीर बचाव

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim ), छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. हे प्रकरण अद्याप न्यायालयीन विचाराधीन आहे यावर भर देत मलिक यांनी विशिष्ट प्रकरणाच्या तपशीलांवर चर्चा करणे टाळले, परंतु कोर्टाचा निर्णय अखेरीस त्यांचे समर्थन करेल असा विश्वास व्यक्त केला.

मलिकांच्या उमेदवारीबाबत भाजपची भूमिका

दाऊद इब्राहिमशी मलिकचे कथित संबंध असल्यामुळे भाजपने त्याच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. काल एका निवेदनात, महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख आशिष शेलार यांनी घोषित केले की, "दाऊदशी संबंधित कोणत्याही प्रकरणाशी संबंधित कोणालाही आम्ही पाठींबा देणार नाही". अजित पवारांनी अखेरच्या क्षणी मलिकांना पाठिंबा दिल्यानंतर, भाजप त्यांच्यासाठी प्रचार करणार नाही, असे शेलर यांनी स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी टीका करताना पुढे म्हटले की, 'नवाब मलिक हा दहशतवादी आहे, ज्याने भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला. तो दाऊदचा एजंट आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मलिकांना उमेदवारी देऊन देशाचा विश्वासघात केला आहे.

अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मलिक यांनी आज स्पष्ट केले की, सुरुवातीला ते ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. "मी पाच वेळा आमदार आणि सहा वेळा मंत्री म्हणून काम केले आहे", असे त्यांनी स्पष्ट केले. मलिक म्हणाले की, मी या निवडणुकीत सहभागी होणार नव्हतो. पण, शिवाजीनगर आणि मानखुर्दच्या लोकांनी आग्रह केल्यामुळे मी उमेदवारी दाखल केली आहे.