Nawab Malik on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस मोफत देण्याच्या घोषणेनंतर नवाब मलिक यांची 'या' भाषेत टीका
त्यामुळे राज्य सरकारांना मोफत लसीचे डोस दिले जाणार असून त्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही आहे. अशातच आता महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरणावरुन केलेल्या घोषणेनंतर टीका केली आहे.
Nawab Malik on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलेच. पण 3 मोठ्या घोषणा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान केल्या. त्यात मोदी यांनी असे म्हटले की, येत्या 21 जून नंतर 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाईल. त्यामुळे राज्य सरकारांना मोफत लसीचे डोस दिले जाणार असून त्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही आहे. अशातच आता महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत लसीकरणावरुन केलेल्या घोषणेनंतर टीका केली आहे.
नवाब मलिक यांनी मोदी यांच्यावर टीका करत असे म्हटले आहे की, त्यांनी या निर्णयाची घोषणा अशावेळी केली आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना सरकारच्या लसीकरणाच्या योजनेबद्दल प्रश्न विचारले. त्याचसोबत प्रतिज्ञापत्र सुद्धा दाखल करण्यास सांगितले. उशिर झाला आहे पण हे गरजेचे आहे. लोकांना दिसून येत आहे की, सरकार कोविडच्या परिस्थितीशी लढण्यास अपयशी ठरत आहे. नियंत्रणाचे नुकसान करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.(PM Narendra Modi Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लसीकरणाबद्दल मोठ्या घोषणेसह 'या' मुद्द्यांवर महत्वाचा निर्णय)
Tweet:
दरम्यान, मोदी यांनी कोरोनाच्या काळात लसीसंदर्भात व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्या आणि माहितींमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या. तसेच प्रसार माध्यमांनी सुद्धा त्या बद्दल विविध तर्कवितर्क काढले. जे नागरिक लसीकरणांबद्दल अफवा पसरवत आहेत ते भोळ्याभाबड्या लोकांच्या आयुष्यासोबत खेळत आहेत. तर नागरिकांसह तरुणांनी सुद्धा देशात लसीकरणासंदर्भात जागृतकता वाढवावी. कोरोनाच्या काळात सूट दिली म्हणजे कोरोना संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह सावध राहिले पाहिजे. कोरोनच्या लढाईत आपण सर्वजण जिंकू असा ठाम विश्वास मोदी यांनी अखेरीस व्यक्त केला.