Navratri 2019: गरबा-दांडिया चालणार आज रात्री 12 वाजेपर्यंत; मुंबई पोलिसांनी वाढवली लाऊड स्पीकरची वेळ

मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत अकांऊटवरुन ही माहिती दिली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Gujarati Garba/Facebook)

मुंबईत (Mumbai) नवरात्रोत्सव (Navratri 2019) अगदी उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. यातच मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) नवरात्री उत्सव साजरा करणाऱ्यांच्या आनंदात आणखी भर टाकली आहे. मुबई पोलिसांनी लाऊड स्पीकरची (Loudspeaker) वेळ वाढवल्यामुळे, आज सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत गरबा- दांडिया खेळता येणार आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत अकांऊटवरुन ही माहिती दिली आहे.

मुंबई ठिकठिकाणी गरबा- दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले जाते. मात्र, प्रशासनाकडून रात्री 10.30 वाजल्यानंतर लॉऊडस्पीकर लावण्यास बंदी असल्यामुळे गरबा आणि दांडिया खेळणाऱ्यांमध्ये निराशा निर्माण होते. परंतु, गरबा दांडिया खेळणाऱ्यासांठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे मुंबई पोलिसांकडून लाऊड स्पीकरची वेळ वाढवून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत केली आहे. यामुळे गरबा दांडिया खेळणाऱ्यांचा उत्साह आणि आनंदात नक्की वाढ होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 'परी हू मैं' ते 'चोगाडा' ही एव्हरग्रीन हिंदी गाणी तुम्हांला नक्की थिरकायला लावतील यंदा गरबा नाईट्स मध्ये

मुंबई पोलिस ट्वीट

मुंबईत नवरात्री उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरम्यान, देवीच्या मूर्तीची स्थापना करुन 9 दिवस पूजा केली जाते. देवीच्या मुर्तीची स्थापना केल्यानंतर 9 दिवस उपासना केल्याने संबधित व्यक्तिच्या मागचे संकट पूर्णपणे नष्ट होतात, असा काही लोकांचा समज आहे.