Navi Mumbai to Mumbai Water Taxi Timetable: बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी च्या वेळा, तिकीट दर इथे घ्या जाणून
सध्या नवी मुंबई - मुंबई - नवी मुंबई दरम्यान प्रति दिन सकाळ, संध्याकाळ एकच फेरी चालवली जाणार आहे.
नवी मुंबई-मुंबई चा प्रवास आता जलमार्गे देखील नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच नवी मुंबईतील बेलापूर जेट्टी (Belapur Jetty) ते मुंबई तील गेट वे ऑफ (Gateway Of India) इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवा सुरू केली आहे. ‘NAYAN XI’ही सेवा नवी मुंबई ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे. यापूर्वी मांडवा पर्यंत असणारी ही सेवा आता वाढवण्यात आली आहे. नक्की वाचा: Water Taxi: बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान नवीन वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन, पहा व्हिडिओ .
Nayan XI वेळा
सध्या नवी मुंबई - मुंबई - नवी मुंबई दरम्यान प्रति दिन सकाळ, संध्याकाळ एकच फेरी चालवली जाणार आहे. प्रामुख्याने नवी मुंबई मधून मुंबई मध्ये कामाला येणारी मंडळी हा त्यांचा टार्गेट ग्रुप आहे. त्यामुळे सकाळी बेलापूर मधून 8.30 ला बोट सुटणार आहे ती गेट वे ऑफ इंडियाला 9.30 वाजता पोहचणार आहे. तर संध्याकाळी 6.30 वाजता गेट ऑफ इंडिया मधून बोट प्रस्थान करेल आणि 7.30 वाजता बेलापूरला पोहचणार आहे.
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान चालणार्या या टॅक्सी मध्ये लोअर डेक मध्ये 140 आणि अपर डेक मध्ये 60 प्रवासी बसू शकणार आहेत. लोअर डेक साठी 250 रूपये आणि अपर डेक साठी 350 रूपये तिकीट असणार आहे. Nayantara, MyBoatRide.com वर तिकीट बुकिंग करता येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअरिंग रिक्षा जेटीवर ₹10 मध्ये उपलब्ध असतील आणि बेलापूर स्टेशनपासून शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते चर्चगेट आणि सीएसएमटीपर्यंत कॅब आणि बसेस उपलब्ध असणार आहेत.