Navi Mumbai: पत्नीकडे शरीरसुखाची मागणी, दुकानदाराकडून 80 वर्षीय व्यक्तीची हत्या
80 वर्षीय नागरिकाची हत्या केल्याचा आरोप या दुकानदारावर आहे. शमाकांत तुकाराम नाईक असे मृताचे नाव आहे. नाईक यांचा मृतदेह 4 सप्टेंबर रोजी उलवे येथील सेक्टर 12 मध्ये एका तलावात सापडला होता.
नवी मुंबई पोलिसांनी ( Navi Mumba Police ) उलवे (Ulwe) परीसरातून मोहन चौधरी नामक एका 33 वर्षीय दुकानदाराला अटक केली आहे. 80 वर्षीय नागरिकाची हत्या केल्याचा आरोप या दुकानदारावर आहे. शमाकांत तुकाराम नाईक असे मृताचे नाव आहे. नाईक यांचा मृतदेह 4 सप्टेंबर रोजी उलवे येथील सेक्टर 12 मध्ये एका तलावात सापडला होता. पत्नीकडे शरीरसुखाची मागणी (Demanding Sex From Wife) केल्याच्या कथीत संशयावरुन दुकानदार मोहन चौधरी याने शमाकांत नाईक यांची हत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.
शमाकांत तुकाराम नाईक हे एक श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता होती. तर मोहन चौधरी हा किराना दुकान चालवत असे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाईक हे मोहन चौधरी यांच्या पत्नीकडे कथीत शरीरसुखाची मागणी करीत असत. तसेच, नाईक हे जेव्हा चौधरी याच्या दुकानाला भेट देत तेव्हा ते पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करत असत. तसेच, एकवेळ सोबत झोपण्यासाठी ते 5,000 रुपये देतो असे सांगत असत. (हेही वाचा, Kalyan: कल्याण येथील गांधारी परिसरात महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला, पतीनेच हत्या केल्याची पोलिसांना संशय; तपास सुरु)
दरम्यान, 29 ऑगस्ट या दिवशी शमाकांत नाईक हे चौधरी याच्या दुकानात आले. त्यांनी त्याच्याकडे पत्नीसोबत शरीसंबंध ठेवण्यासाठी 10,000 हजार रुपये देऊ केले. तसेच, चौधरी यांना सांगितले की, त्यांची पत्नी हिना चौधरी यांना भेटण्यासाठी गोडाऊनमध्ये पाठव. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
नाईक यांनी केलेल्या विक्षिप्त मागणीमुळे मोहन चौधरी संतप्त झाले. त्यांनी नाईक यांन जोराचा धक्का दिला. या धक्क्याने नाईक यांचे डोके टेबलाच्या कोपरावर आपडले. घाव वर्मी लागल्याने नाईक हे जमीनीवर पडले. त्यांनतर नाईक याने कथीतरित्या दुकान बंद केले आणि नाईक यांची गळा दाबून हत्या केली.
दरम्यान, शमाकांत तुकाराम नाईक यांचा मुलगा शेखर याने वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. सुरुवातीला पोलिसांना संशय होता की मालमत्तेच्या वादातून नाईकची हत्या झाली आहे. दरम्यान, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये चौधरी 31 ऑगस्ट रोजी आपल्या दुचाकीच्या मागे बेडशीटमध्ये गुंडाळलेले काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसून आले. चौकशीनंतर तो मारेकरी मोहन चौधरी असल्याचे उघड झाले, असे पोलिसांनी सांगितले.