नवी मुंबई: XXX व्हिडिओ पाहण्यासाठी दोन मुलींवर जबरदस्ती; आरोपीला अटक
त्यांनी घटनेची नोंद घेत हा प्रकार घडलेल्या परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी आरोपीला अटक केली. आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा पोलीस शोध घेत आहेत.
इंटरनेटवरील अश्लील संकेतस्थळं(Porn websites) आणि तशाच प्रकारचा कंटेंट पुरवणाऱ्या शेकडो संकेतस्थळांवर केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी, अश्लिल व्हिडिओ (Porn Clips) खुलेआमपणे पाहिले जात आहेत. इतकेच नव्हे तर, हे व्हिडिओ पाहण्यासाठी सक्तीही केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) येथील पनवेल पोलिसांनी (Panvel City Police) एका तरुणाला अटक केली आहे. पॉर्न व्हिडिओ (Porn Video) (अश्लिल चित्रफीत) पाहण्यासाठी दोन मुलींवर जबरदस्ती केल्याचा या तरुणावर आरोप आहे. विकेश चौहान ( Vikesh Chauhan) (वय 29 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहिती अशी की, विकेश चौहान याने दोन अल्पवयीन मुलींना आग्रह करत होता की, त्याच्या मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओ त्यांनीही पाहावेत. मात्र, या दोन्ही मुलींनी विकेश याच्या मोबाईलमधील पॉर्न क्लिप्स (व्हिडिओ) पाहायला नकार दिला. मुलींनी दिलेला नकार पाहून विकेश अधिकच आक्रमक झाला. त्याने त्या दोन्ही मुलींना पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. तरीही या मुली आपल्या मतावर ठाम होत्या. त्यांनी विकेशला नकारच दिला. मुलींनी इतका नका दिल्यानंतरही विकेशने आपला हट्ट सोडला नाही. तो त्यांना अधिकच जबरदस्ती करु लागला. अखेर मुलींन विकेशला निकराचा विरोध करुन थेट पोलिस स्टेशन गाठले आणि त्याच्याविरोधात दाद मागितली. (हेही वाचा, पुणे: कपडे बदलताना महिलेचा अश्लिल व्हिडिओ; नामांकित हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयला अटक)
दोन मुलींनी दिलेल्या माहितीनंतर पनवेल (Panvel) पोलीस सतर्क झाले. त्यांनी घटनेची नोंद घेत हा प्रकार घडलेल्या परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी आरोपीला अटक केली. आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा पोलीस शोध घेत आहेत.