खारघर येथील पांडवकडा धबधब्यात वाहून गेलेल्या 4 तरुणींचे मृतदेह सापडले

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील घारखर (Kharghar) मधील पांडवकडा (Pandavkada Waterfall) धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली होती.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील घारखर (Kharghar) मधील पांडवकडा (Pandavkada Waterfall) धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या चार जणींपैकी तीन तरुणींचा मृतदेह त्याच दिवशी सापडला होता. तर आज एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे.

नेहा दमा असे तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह आज बेलापूर येथील खाडीत सापडला आहे. मृतदेहाबद्दल अधिक तपासणी करण्यात येत असून तरुणीच्या घरातील मंडळींना खारघर येथील पोलीस स्थानकात बोलावण्यात आले आहे. नेहा हिचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोधण्याचे काम सुरु होते. अखेर आज तिचा मृतदेह हाती लागला आहे.(नवी मुंबई: खारघर येथील पांडवकडा धबधब्यात 4 तरुणी वाहून गेल्या; शोधकार्य सुरु Watch Video)

मृत झालेल्या तरुणी कॉलेज संपल्यावर पांडवकडा येथील धबधब्यावर पावसाची मजा घेण्यासाठी गेला होता. तेव्हाच ही दुर्घटना घडली. यापूर्वी सुद्धा अनेकजण या ठिकाणी वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणाईकडून होणाऱ्या बेपर्वाईमुळे पोलिसांनी पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे. तरीही देखील मुसळधार पावसात नियमांचे उल्लंघन करत या तरुणी धबधब्यावर गेल्या आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले.