Navi Mumbai Metro Ticket Rates: नवी मुंबई मेट्रो वेगात धावली, अनेकांच्या खिशाला नाहीच परवडली; जाणून घ्या तिकीट दर
मेट्रो लेन-1 नुकतीच सुरु झाली. पहिल्या एकदोन दिवसांमध्ये प्रवाशांनी चढ्या तिकीट दरावरुन नाराजी व्यक्त केली आहे.
CBD Belapur to Pendhar Taloja Fare: नवी मुंबई मेट्रो तिकीट दर (Navi Mumbai Metro Ticket Rates) अनेकांसाठी महागडे ठरत असल्याची प्रतिक्रिया पहिल्याच दिवशी आली आहे. एकदोन नव्हे तर तब्बल 12 वर्षांची प्रतीक्षा संपवून मेट्रो अखेर धावली. बेलापूर ते पेंधर (Belapur to Pendhar Taloja Metro) असा साधारण 11 किलोमीटरचा प्रसवास तिने केला. प्रदीर्घ काळ चर्चेत असल्याने सहाजिकच नवी मुंबईतील नागरिकांना या सेवेची उत्सुकता होती. दर 15 मीनिटांनी एक या सरासरीने मेट्रोची फेरी पार पडणार आहे. एक हजारांहून अधिक अशी मेट्रोची क्षमता आहे. दरम्यान, शहातील (नवी मुंबई) पहिल्यावहिल्या मेट्रोच्या फेरीबाबत प्रवाशांना उत्सुकता होती. त्यामुळे प्रवाशांनी सेवेचा लाभ घेत प्रवास केला खरा. मात्र, तिकीट दरांवरुन तीव्र नापसंती व्यक्त केली.
एकेरी प्रवासासाठी मानसी 40 रुपये
नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेंधर या एकेरी प्रवासासाठी मानसी 40 रुपये प्रति इतका तिकीट दर आहे. तर हाच प्रवास जर दुहेरी करायचा तर तो जवळपास 40+40= 80 रुपये इतका होतो. त्यामुळे हे तिकीट दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे ते कामगार वर्गाला परवडणार नाहीत. त्यामुळे हेच दर जर 20 त 30 रुपये इतके असतील तर ते लोकांना परवडतील अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, या मेट्रोमुळे तळोजा नोडला आता चांगले दिवस येतील असे बोलले जात आहे.
नवी मुंबई मेट्रो तिकीट दर
शून्य ते दोन किलोमीटरचा टप्पा- 10 रुपये (एकेरी प्रवास)
- दोन ते चार किलोमीटरचा टप्पा- 15 रुपये (एकेरी प्रवास)
- चार ते सहा किलोमीटरचा टप्पा- 20 रुपये (एकेरी प्रवास)
- सहा ते आठ किलोमीटरचा टप्पा- 25 रुपये (एकेरी प्रवास)
- आठ ते 10 किलोमीटरचा टप्पा- 30 रुपये (एकेरी प्रवास)
- 10 ते पूढील सर्व अंतराकरिता- 40 रुपये (एकेरी प्रवास)
- दरम्यान, आरत परत (दुहेरी) प्रवासासाठी वरील तिकीट दराच्या दप्पट दर लागू असतील.
नवी मुंबई मेट्रो 1 मार्गिका आणि स्थानके
- सीबीडी-बेलापूर
- सेक्टर 7
- सिडको सायन्स पार्क
- उत्सव चौक
- खारघर सेक्टर 11
- खारघर, सेक्टर 14
- खारघर सेंट्रल पार्क
- पेठपाडा
- खारघर सेक्टर 34
- पाचनंद
- पेंधर-तळोजा
'नागरिकांचा प्रवासात जाणारा वेळ वाचेल'
सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्याने नागरिकांचा प्रवासात जाणारा वेळ वाचेल. शिवाय, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासालाही गती येईल. ही सेवा तळोजा आणि खारघर नोड्समधील रहिवाशांना सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी पर्याय प्रदान करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनण्याच्या दृष्टीने ही वाहतूक महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही डिग्गीकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान,तीन टप्प्यांत विकसित होणाऱ्या कॉरिडॉर-1 साठी नवी मुंबई मेट्रोचे बांधकाम, देखभाल आणि संचालन यासाठी महाराष्ट्र सरकारने सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) ची निवड केली आहे. नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी 1 मे 2011 रोजी करण्यात आली. कॉरिडॉर-1 मार्गामध्ये बेलापूर, खारघर, पेंढार, कळंबोली आणि खांदेश्वर यांचा समावेश आहे आणि त्याचा विस्तार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत (NMIA) करण्याची योजना आहे. कॉरिडॉर-1 हा नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) द्वारे तयार केलेल्या तपशीलवार प्रकल्प अहवालावर आधारित आहे. या सेवेचा पहिला टप्पा कार्यन्वीत झाला आहे.