‘Dead Body’ Stunt in Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये Laptop Store च्या जाहिरातीसाठी 'डेड बॉडी' स्टंट; चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल
लॅपटॉप शॉपच्या प्रसिद्धी स्टंटमुळे दहशत निर्माण झाल्याने नवी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला. गाडीच्या डीक्कीतून हात बाहेर काढल्याने मृतदेहाची भीती निर्माण झाली, ज्यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
Vashi Laptop Shop: 'जाहिरातीसाठी कायपण' म्हणत कारच्या डीक्कीमध्ये कथीत मृतदेह ठेवल्याचा प्रँक आणि लोकांना घाबरवण्याचा अघोरी प्रयत्न करुन प्रसिद्धी मिळविण्याची उठाठेव करणाऱ्या चौघांविरुद्ध नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) गुन्हा (FIR News) दाखल केला आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका विचित्र मार्केटिंग स्टंटमुळे (Laptop Store Stunt) रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि ते ऑनलाइन व्हायरल झाले. ही घटना एका पांढऱ्या इनोव्हा कारशी संबंधित होती, ज्यामध्ये एका व्यक्तीचा हात बंद डीक्कीमधून बाहेर लटकलेला दिसला - असे दृश्य पाहून पाहणाऱ्यांना वाटले की आत एक मृतदेह आहे. रस्त्यावरुन कारच्या पाठीमागे वाहन हाकणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. त्यामुळे हे त्रासदायक दृश्य एका नागरिकाने व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला, ज्याने स्थानिक पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. तातडीने कारवाई करून, नवी मुंबई पोलिसांनी त्याच्या नोंदणी तपशीलांचा वापर करून दोन तासांत कारचा शोध घेतला.
लॅपटॉप स्टोअरची धक्कादायक जाहीरात
नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,, ही गाडी नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे येथील रहिवासी मीनहज शेखने (Meenhaj Shaikh) लग्नाच्या कार्यक्रमासाठी उधार घेतली होती. चौकशी केल्यानंतर शेखने उघड केले की तो वाशीमध्ये लॅपटॉप दुरुस्तीचे दुकान चालवतो आणि हा गट दुकानासाठी एक प्रमोशनल रील (Promotional Reel) चित्रित करत होता. दरम्यान, ही रील अद्याप संबंधीत व्यक्तीकडून सोशल मीडियावर अपलोड करण्यापूर्वीच व्हायरल झाल्याचे पुढे येत आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, एक दुचाकीस्वार गाडीजवळ येत होता आणि ड्रायव्हरला डीक्की उघडण्यास सांगत होता. त्याच वेळी डिक्की उघडताच आत असलेला जीवंत माणूस, समोरच्या व्यक्तीस म्हणत असे, भीती वाटली? घाबरु नका. मी मेलेलो नाही. जीवंत आहे. आम्ही एका लॅपटॉप स्टोअरची जाहीरात करत आहोत, तुम्ही आमच्याकडे आमच्याकडे असलेल्या आश्चर्यकारक ऑफर्स ऐका. (हेही वाचा, OP Jindal University Viral Video: विद्यार्थ्याचा प्रेयसीला सुटकेसमध्ये घालून बॉयज हॉस्टेलमध्ये नेण्याचा प्रयत्न; सोनीपतच्या ओपी जिंदाल विद्यापीठातील धक्कादायक प्रकार (Watch))
धावत्या कारच्या डीक्कीत लटकता हात
सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) अजय लांडगे यांनी सांगितले की, हे कृत्य प्रचारात्मक असले तरी, अनावश्यक भीती आणि सार्वजनिक गोंधळ निर्माण करत होते. त्यांनी रील चित्रीकरण करताना निष्काळजीपणे वाहन चालवले. आम्ही मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे ते म्हणाले. चित्रीकरणादरम्यान सार्वजनिक त्रास निर्माण करणे आणि बेपर्वाईने गाडी चालवल्याबद्दल कारमधील चारही प्रवाशांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा धोकादायक प्रसिद्धी स्टंटविरुद्ध पोलिसांनी इशारा दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)