Navi Mumbai Flamingos Death: नेरूळ जेट्टी जवळ आढळले 4 फ्लेमिंगो मृतावस्थेमध्ये; CIDCO च्या साईनबोर्डला धडकल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक Kilas Shinde, यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
नवी मुंबई मध्ये World Wetlands Day च्या पूर्वसंध्येला एक चार फ्लेमिंगो (Flamingos) साईन बोर्डला धडकून मृत्यूमुखी पडल्याची करूण घटना समोर आली आहे. हा प्रकार नेरूळ जेट्टी (Nerul Jetty) वर satellite township वर झाला आहे. फ्लेमिंगोंची धडक साईन बोर्डला बसल्याचं काहींनी पाहिलं देखील आहे. Bombay Natural History Society कडून या घटनेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मॉर्निंग वॉकला जाणार्या काही जॉगर्सनी हा प्रकार पाहिला आहे. त्यांनी फ्लेमिंगोच्या धडकेचा आवाज ऐकला आहे. तसेच फ्लेमिंगो कोसळल्याची घटना देखील जॉगर्सच्या नजरेसमोर घडली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सीडको कडून उभारण्यात आलेला 20 फूटी साईनबोर्ड हा वेटलॅन्ड जवळ आहे तो या फ्लेमिंगोंच्या वाटेत येतो. दरम्यान मागील वर्षी देखील याच ठिकाणी फ्लेमिंगो मृतावस्थेमध्ये आढळले होते.
पर्यावरणवादी वकील प्रदीप पाटोळे हे राज्य सरकारकडे हा मुद्दा घेऊन पोहचले आहेत. सरकारने या बोर्डाला हटवावे किंवा किमान त्याची उंची कमी करावी अशी मागणी त्यांनी सरकारसमोर ठेवली आहे. Activist BN Kumar यांनी आपण या पक्ष्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाकडे नीट पाहण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे. Wildlife (Protection) Act, 1972 चया पाचव्या शेड्युल अंतर्गत फ्लेमिंगो स्थलांतरित पक्षी असल्याने त्यांच्या मृत्यूचं पोस्ट मार्टम केले जावं आणि मृत्यूचं कारण काय असेल ते समोर आणावं असं म्हटलं आहे.
सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक Kilas Shinde, यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)