Navi Mumbai News: तुर्भेत गणपती विसर्जनात दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल
गणेश विसर्जन मिरवणुकीत एका रिक्षाचालकाने तरुणाचा विनयभंग करत तीला शिवीगाळ केला.
Navi Mumbai News: नवी मुंबईत गणेश विसर्जनावेळी धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत एका रिक्षाचालकाने तरुणाचा विनयभंग करत तीला शिवीगाळ केला. या प्रकरणात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. 24 सप्टेंबर रोजी तुर्भे येथे घडलेल्या या घटनेसाठी पोलीसांनी कलम 354 गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षत डॉ. दत्ता डफळ म्हणाले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तरूणींच्या कुटूंबीयांनी या घटनेमुळे संताप व्यक्त केला आहे.
पीडिताने पोलीसांत तक्रारी नुसार, 24 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तुर्भे नाक्यावरून गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने तिचा हात पकडून तिला शिवीगाळ केली, असे त्याने सांगितले. ती घाबरलेल्या अवस्थेत असताना जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला.
पीडितेने पोलीसा ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती दिली. पोलीसांत दिलेल्या तक्रार दिली. आरोपीने तिचा विनयभंग केल्यावर दोघांमध्ये जोरदार वाद झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या घटनेचा तपास करत असून अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.