Navi Mumbai Drowning Case: नवी मुंबई मध्ये शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाचा 22 वर्षीय नातू हिंमाशू म्हात्रे याचा खाडीत बुडून मृत्यू
बुडून मृत्यूमुखी पडलेल्या हिमांशु म्हात्रे हा माजी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांचा नातू आहे.
नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये खाडी मध्ये बुडून एका 22 वर्षीय हिमांशू म्हात्रे (Himanshu Mhatre) तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुर्भे (Turbhe) मध्ये ही घटना घडली आहे. रविवार 6 ऑगस्टच्या संध्याकाळी 6.30 वाजता दुर्घटना घडली आहे. नवी मुंबई फायर ब्रिगेड रिस्क्यु टीम कडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते, पण त्यांना सोमवारी पहाटेपर्यंतही यश आले नव्हते. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कडे पहाटे 6 च्या सुमारास एक तरुण बुडाल्याची भीती बोलून दाखवण्यात आली. त्यानंतर Thane TDRF team घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी केलेल्या सर्च ऑपरेशन नंतर तरूणाचा बुडालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
दरम्यान हा बुडून मृत्यू पावलेला तरूण हिमांशू म्हात्रे आहे. कोपरखैरणे येथील बोंकोडे गावाचा तो रहिवासी आहे. हिमांशू हा माजी शिवसेना नेते आणि माजी नवी मुंबई जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांचा नातू आहे.
खाडीत पोहायला गेलेल्या हिमांशूला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडाला असावा असा अंदाज आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे अधिकारी यासिन तडवी यांनी PTI शी बोलताना सांगितले आहे. नक्की वाचा: Versova Beach Drowning Case: मुंबई मध्ये वर्सोवा बीच वर हरियाणाचे 2 तरूण सापडले मृतावस्थेत!
हिंमाशूचा मृतदेह हाती आल्यानंतर पोस्ट मार्टमसाठी तो सरकारी रूग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. रबाळे पोलिसांनी हिंमाशू म्हात्रेच्या निधनाची नोंद अपघाती निधन अशी केली आहे.