Navi Mumbai Cobra Alert: सुरक्षा रक्षकाच्या बूटात साप, नवी मुंबईत एका दिवशी सापदर्शनाच्या दोन घटना; कोणतीही इजा नाही
नवी मुंबईत एका दिवशी दोन कोब्रा सापदर्शनाच्या घटना घडल्या. एक साप सुरक्षा रक्षकाच्या बूटात सापडला, तर दुसरा झाडांच्या जाळीत अडकला. दोन्ही साप सुखरूपरीत्या जंगलात सोडण्यात आले.
Navi Mumbai News: नवी मुंबईत सोमवारी घडलेल्या दोन वेगळ्या घटकांमुळे स्थानिकांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली. या दोन्ही घटनांमध्ये कोब्रा जातीचे साप आढळले आणि सुदैवाने दोन्ही प्रसंगी कोणतीही इजा न होता साप सुरक्षितपणे (Snake Rescuer Navi Mumbai) सोडण्यात आला. यातील पहिल्या घनटेत नवीमुंबई येथील महापे परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या बुटात साप आढळून आला. तर दुसऱ्या घटनेत एक साप झाडांच्या जाळीत आढळून आला. विशेष म्हणजे दोन्ही साप विषारी किंग कोब्रा (Cobra Snake) होते.
एमआयडीसी महापे परिसरात बूटात सापडला साप
पहिली घटना महापे एमआयडीसी परिसरात घडली. एका कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने पावसामुळे बूट केबिनच्या बाहेर ठेवले होते. परत बूट घालताना त्याला आत काहीतरी हालचाल जाणवली. काळजीपूर्वक पाहणी केल्यानंतर त्याला बूटात गुंडाळलेला कोब्रा सापडला, असे वृत्त The Times of India ने दिले आहे. सुरक्षा रक्षकाने त्वरित सर्पमित्र अक्षय डांगे यांना बोलावले. त्यांनी घटनास्थळी येत साप सुरक्षितरित्या बाहेर काढला आणि नंतर त्याला जंगलात सोडण्यात आले. रक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्राच्या तातडीच्या प्रतिसादामुळे कोणतीही हानी झाली नाही.
समुद्री नौमहिन्याच्या प्रवासानंतर घरी परतलेल्या खलाशाच्या घरी कोब्रा
दुसरी घटना नवी मुंबईच्या न्हावा गावातील रहिवासी वैभव म्हात्रे यांच्या घरी घडली. ते 2025 च्या 1 मार्चला नौमहिन्यांच्या समुद्री प्रवासानंतर घरी परतले होते. त्यांनी हा प्रवास जॉर्जटाउन (गयाना) येथून सुरू करून सिंगापूरमध्ये संपवला. परतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या आईने त्यांना उठवले आणि सांगितले, 'कोणीतरी पाहायला आलंय.' मात्र पाहुणा काही नातेवाईक नसून बागेतील झाडांच्या जाळीत अडकलेला विषारी कोब्रा निघाला. म्हात्रे हे 2014 पासून सर्पमित्र असल्यामुळे त्यांनी योग्य तांत्रिक पद्धतीने सापाला सुटका करून पाण्याने त्याचे डोके धुतले, कारण तो निदानपणामुळे आणि जखमेने अशक्त झाला होता. त्यांनी त्याला हवा खेळती राहील अशा पाण्याच्या कॅनमध्ये ठेवले. ते म्हणाले, “साप माणसाचा पाठलाग करत नाही. फक्त त्याला धोका वाटला तर तो हल्ला करतो. लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत.”
या दोन घटनांमुळे नवी मुंबईमध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यातील संपर्कात वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. विशेषतः पावसाळ्यात सापांच्या घटना अधिक प्रमाणात दिसून येतात. अक्षय डांगे आणि वैभव म्हात्रे यांच्यासारख्या प्रशिक्षित सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अशा घटनांत जीवितहानी टळते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)