नवी मुंबई: बिल्डरला धमकावण्यासाठी चक्क बॉम्बचा उपयोग, तिघांना अटक
नवी मुंबई (Navi mUmbai) येथे चक्क बिल्डरला धमकावण्यासाठी बॉम्बचा उपयोग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबई (Navi mUmbai) येथे चक्क बिल्डरला धमकावण्यासाठी बॉम्बचा उपयोग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शाळेच्या बाहेर बॉम्ब सापडल्याने प्रथम घातपात करण्याच्या कटा असल्याच्या भीतीमुळे घबराट निर्माण झाली होती.
सुशील साठे, मनीश भगत आणि दीपक दांडेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी दांडेकर असून त्यांनी हा कट रचला होता. मात्र शाळेबाहेर उभ्या असलेल्या रस्त्यावरील हातगाडीवर एका खोक्यात बॉम्ब सापडला.(औरंगाबद: वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये 27 कोटी रुपयांच्या सोन्यावर डल्ला, आरोपींना अटक)
तर पोलिस तपासात असे समोर आले आहे की, एका टोपी घातलेल्या व्यक्तीने शाळेबाहेर हातगाडी उभी केली. याचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. तसेच व्यक्तीने आपला चेहरा दिसू नये यासाठी पूर्णपणे काळजी घेत तेथून पळ काढला आहे.