नवी मुंबई: तरुणाची पॅन्ट उतरवून गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न; दिघा येथे धुलीवंदनाच्या दिवशी घटना

त्यामुळे हे सर्वच जण तऱ्हाट झाले होते. पीडित तरुणाला दारुमुळे ग्लानी आली आणि तो झोपी गेला. दरम्यान, झोपलेल्या अवस्थेत त्याने पॅन्टमध्येच लघुशंका केली. याचा राग आल्याने त्याच्या मित्रांनी त्याची पॅन्ट उतरवली आणि त्याचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न केला

Young Man | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

एका तरुणाची पॅन्ट उतरवून त्याचे गुप्तांग (Genitals) जाळण्याचा धक्कादयाक प्रकार नवी मुंबई (Navi Mumbai) येथील दिघा (Navi Mumbai, Digha) येथे घडल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणाच्या मित्रांनीच हे कृत्य केले आहे. या मित्रांनी हे कृत्य करतानाचा व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ WhatsApp च्या माध्यमातून अनेकांच्या मोबाईलमध्ये पोहोचून व्हायरल झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. रबाळे MIDC पोलिस स्टेशनमध्ये या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धुलीवंदनाच्या दिवशी घडली.

पीडित तरुण आणि त्याचे मित्र या सर्वांनी धुलीवंदनाच्या दिवशी भरपूर प्रमाणावर दारुचे सेवन केले होते. त्यामुळे हे सर्वच जण तऱ्हाट झाले होते. पीडित तरुणाला दारुमुळे ग्लानी आली आणि तो झोपी गेला. दरम्यान, झोपलेल्या अवस्थेत त्याने पॅन्टमध्येच लघुशंका केली. याचा राग आल्याने त्याच्या मित्रांनी त्याची पॅन्ट उतरवली आणि त्याचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित तरुणाला मोठी इजा झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दारुच्या नशेत केवळ थिल्लरपणा म्हणून पीडित तरुणाच्या मित्रांनी अघोरीपणा केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश काळे आणि नितेश खारकर असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या किळसवाण्या प्रकाराचे व्हिडिओ शुटींग करुन ते व्हायरलही केले. या प्रकारामुळे परीसरात संताप व्यक्त होत आहे.  (हेही वाचा, ठाणे: महिलेने कापले तरुणाचे गुप्तांग; तिघांना अटक)

विशेष म्हणजे दारुच्या नशेत तर्र असलेल्या पीडित तरुणाला आपल्यासोबत काय घडते आहे याची कल्पनाच नव्हती. सकाळी पहाटे उजाडल्यावर त्याला शुद्ध आली. त्यानंतर त्याला आपल्यासोबत घडलेला प्रकार ध्यानात आला. त्यानंतर या तरुणाने थेट रबाळे MIDC पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला.