नवी मुंबई: वाशी मधील AMPC मार्केट येत्या 11 मे पासून बंद राहणार

याच दरम्यान, नवी मुंबईतील वाशी (Vashi) स्थित असलेले एपीएमसी मार्केट (APMC Market) येत्या 11 ते 17 मे पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

APMC Market (Photo Credits-Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. याच दरम्यान, नवी मुंबईतील वाशी (Vashi) स्थित असलेले एपीएमसी मार्केट (APMC Market) येत्या 11 ते 17 मे पर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात एपीएमसी मार्केट मधील व्यापारी आणि कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळेच आता एपीएमसी मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. एपीएमसी व्यवस्थापन आणि एनएमएमसी कडून मार्केटचे निर्जंतुकीकरण आणि तपासणी करण्यात येणार आहे. मार्केट फक्त शनिवार-रविवारी सुरु राहणार आहे. एपीएमसी मधील पाचही बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रिन्सिपल सेक्रेटरी अनुप कुमार, आयएस ऑफिसर संजीव जयस्वाल आणि अन्य प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

एपीएमसीमधील अन्नधान, कांदे, बटाटे, मसाले आणि भाजी मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्केटमधून मोठ्या प्रमाणात मुंबईतील मेट्रोपोलिटिन शहरांना पुरवठा केला जातो. नवी मुंबईचे कमीशनर अण्णासाहेब मिसाळ यांनी मुंबई मिररच्या ऑनलाईन टीमला सांगताना असे म्हटले आहे की, ठाणे आणि एमएमआर यांना पुरवठा होईल ऐवढा साठा केला जाणार आहे. जवळजवळ 4 हजार एपीएमसी मधील कागारांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. त्यात व्यापारांचा सुद्धा समावेश आहे.(BMC मध्ये Social Distancing साठी कर्मचा-यांची उपस्थिती 100% वरुन 75 टक्क्यावर आणण्याचा महापालिकेचा निर्णय)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 18 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तसेच राज्याची रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आली आहे. विविध ठिकाणाच्या क्षेत्रातील कोरोनची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात आले आहेत.