Slab Collapses In Nerul: साळेगावात तीन मजली इमारताची स्लॅब कोसळला, दोघांचा मृत्यू तर 4 जण जखमेत
नेरळ येथील दर्शन सोसाटयीतील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Slab Collapses In Nerul: नेरळ (Nerul) येथे स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी नेरळ येथील एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि चार जण गंभीर जखमेत असल्याचे सांगितले जात आहे. स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच बचाव कार्य घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्यांनी अथक प्रयत्नांनी ढीगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. अचानाक स्लॅब कोसळल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतिचे वातावरण झाले. पोलीसांसह रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, नेरुळमधील सारसोळे गावातील सेक्टर 6 मधील दर्शन दरबार सोसायटीमध्ये रात्री 9.10 च्या सुमारास ही घटना घडली. आपत्ती व्यवस्थापन पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतीतील एका हॉलचा स्लॅब कोसळला. "तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, त्याचा परिणाम दुसऱ्या मजल्यावर झाला, ज्यामुळे नंतर दुसरा मजलाही कोसळला," या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण सात जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. दुर्दैवाने, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला, तर जखमी झालेल्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेरुळ येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.