NIA कडून महाराष्ट्र सह देशभर 5 राज्यात 22 ठिकाणी छापेमारी; छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना मधून 3 जण ताब्यात

सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरूणांकडे असलेले दस्तऐवज, मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी केली जात आहे.

NIA | X @ ANI

National Investigation Agency कडून देशभर 5 राज्यामध्ये 22 ठिकाणी दहशतवादी कारवायांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात जालना, मालेगाव आणि संभाजीनगर मध्ये पहाटे चार वाजल्यापासून एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. यात तिघांना ताब्यातही घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव असून तो चामड्याचा व्यापारी असल्याची माहिती आहे. किरपुडा भागातून मौलाना हाफिज याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

एटीएस कक्डून अधिक माहिती देण्यात आलेली नाही परंतू काही तरूणांवर त्यांचा संशय होता. त्यांचा देशविघातक कृत्यांमध्ये समावेश असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान काही तरुणांना ताब्यात घेत आता छापेमारेची कारवाई सुरू आहे. एनआयए या दहशतवादी संघटनेच्या कारवायांशी संबंधित प्रकरणात जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, यूपी, आसाम आणि दिल्ली येथे छापे टाकत आहे. Terrorists Killed In Encounter at Jammu-kashmir: जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार .

मालेगाव मध्ये कारवाई

सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरूणांकडे असलेले दस्तऐवज, मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी केली जात आहे. जम्मू-काश्मीर मधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात काही तरूण असल्याचं कारण देत सध्या ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.