सोलापूर ते विजापूर 25 किमी रस्त्याचे 18 तासांमध्ये डांबरीकरण, 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद; नितीन गडकरी यांची ट्विटद्वारे माहिती
हे काम अवघ्या 18 तासांत पूर्ण करण्यात आल्याने याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर ते विजापूर या मार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाअंतर्गत 25.54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण केलं आहे. हे काम अवघ्या 18 तासांत पूर्ण करण्यात आल्याने याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' (Limca Book of Records) मध्ये झाली आहे. आपल्या खात्याच्या या कामगिरीची आनंद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी या कार्यातील सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. या कार्यात 500 कर्मचारी सहभागी झाले होते.
नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर-विजापूर महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामांतर्गत नुकतेच 25.54 किमी रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या 18 तासांत पूर्ण केले आहे. याची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. या कार्यातील सर्व अधिकारी, निर्देशक, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधिक आणि या योजनेतील कार्याचे सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन."
नितीन गडकरी ट्विट:
(हे ही वाचा: Electric Vehicles: सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अनिवार्य करावा- मंत्री नितीन गडकरी)
नितीन गडकरी यांच्या या ट्विटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सध्या 110 किमी लांबीच्या सोलापूर-विजापूर महामार्गाचं काम सुरु आहे. हे काम ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.