Nashik, Solapur Dam News: इगतपुरी येथील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू; उजनीमध्येही बोट उलटून 4 बेपत्ता
नाशिक (Nashik) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात धरणाशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यात इगतपुरी येथील भावली धरणात बुडून (People Drown in Bhavali Dam) पाच जणांचा मृत्यू झाला तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट उलटल्याने (Boat Capsize in Ujjani Dam) पाच जण पाण्यात पडले. या पाचही जणांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही.
नाशिक (Nashik) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यात धरणाशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. यात इगतपुरी येथील भावली धरणात बुडून (People Drown in Bhavali Dam) पाच जणांचा मृत्यू झाला तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट उलटल्याने (Boat Capsize in Ujani Dam) पाच जण पाण्यात पडले. या पाचही जणांचा अद्यापही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे हे सर्वजण बेपत्ता आहेत. भावली धरणात बुडून मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे. हे पाचही जण मिळून रिक्षा घेऊन फिरण्यासाठी धरणावर आले असता त्यांना पोहण्याचा मोह झाला. ते धरणात उतरले आणि त्यांच्यावर काळाने झडप घातली.
पोहण्याचा मोह अंगाशी
इगतपुरी धावली धरणात बुडालेले सर्वजण नाशिक रोड परिसरातील राहणारे आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नाही. अशा वेळी हे सर्व जण उन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी रिक्षा घेऊन धावली धरणाकडे आले होते. धरणाच्या बाजूला रिक्षा उभा करुन हे सर्वजण पाण्यात उतरले आणि पोहू लागले. दरम्यान, त्यांच्यासोबत दुर्घटना घडली आणि ते बुडाले. एकाच वेळी पाच जण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने धरणाकडे धाव घेतली. प्रशासन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक आदिवासींनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले होते. (हेही वाचा, Jalna News: शेततळात बुडून दोघांचा मृत्यू, जालना येथील धक्कादायक घटना)
उजणी धरणात बोट उलटून चौघे बेपत्ता
दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणातही बोट उलटल्याने चार जण बेपत्ता झाले आहेत. या चौघांसोबतही काही बरे वाईट घडले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी या मार्गावर या बोटीतून (लोंज) वाहतूक केली जाते. नेहमीप्रमाणे वाहतूकीसाठी ही बोट निघाली असता मध्येच ती उलटली. दरम्यान, बोटीत असलेला एक व्यक्ती पोहत बाहेर आल्याने धरणात बोट उलटल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचाव कार्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Kondeshwar तलावात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांचा बुडून दुर्देवी मृत्यू)
दरम्यान, अद्यापही हे शोधकार्य सुरुच असून अत्याप त्याला यश आले नाही. या चौघांचाही पत्ता लागला नाही. बोट पाण्यात असताना बदलत्या वातावरणाचा फटका बसला. अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटले. परिणामी बोट पाण्यात उलटली अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अद्याप तरी या घटनेचा पुरेसा तपशील बाहेर आला नाही. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)