Nashik Shocker: ब्युटी पार्लरमध्ये घुसून व्यावसायिक महिलेवर तब्बल 2 तास लैंगिक अत्याचार; आरोपीला बेड्या

एका मागोमाग एक बलात्काराच्या घटना राज्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. आता नाशिक मधून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यातील बलात्कार, लैंगिक अत्याचाराचे सत्र संपण्याचे नाव घेत नाही. एका मागोमाग एक बलात्काराच्या घटना राज्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. आता नाशिक (Nashik) मधून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ब्युटी पार्लरमध्ये घुसून व्यावसायिक महिलेवर तब्बल 2 तास लैंगिक अत्याचार केल्याची घटना नाशिक मधील पवननगर भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे.

पीडित महिला विधवा असून तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. ती आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करत असताना आरोपी तिच्या पार्लरमध्ये शिरला. त्याने पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. महिलेचे हात बांधून तोंडात बोळा कोंबून तिच्यावर तब्बल 2 तास लैंगिक अत्याचार केला. (Mumbai: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात सुमारे 350 पानांचे आरोपपत्र दाखल- Mumbai Police)

या घटनेनंतर पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी चार पथकं नेमत आरोपीला अटक केली. दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेला तो अलीकडेच पॅरोलवर बाहेर आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याच्या शोधात असतानाच त्यानं बलात्काराचा गंभीर गुन्हा केला. या घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिक मधूनच उघडकीस आली होती. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.