Nashik Robbery: नाशकात दरोडेखोरांची दहशत, दरोड्यात मौल्यवान ऐवज लंपास करत 65 वर्षीय वृध्दाची हत्या

या दरोड्यादरम्यान चोरट्यांनी सहा ते सात लाखांचा रोकड लंपास केला आहे. तसेच दरोड्या दरम्यान 65 वर्षिय वृध्दाची हत्या करण्यात आली आहे.

Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

नाशिक (Nashik) शहरासह आजूबाजूच्या परिसरातून दरोड्या संबंधी विविध घटना कानावर पडत आहे. पण काल नाशकात जे काही ते अत्यंत अमानुष असुन नाशिककरांमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. नाशिक शहरातील अंबड (Ambad) औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट येथे दरोडा पडला आहे. या  दरोड्यादरम्यान चोरट्यांनी सहा ते सात लाखांचा रोकड लंपास केला आहे. तसेच दरोड्या दरम्यान 65 वर्षिय वृध्दाची हत्या करण्यात आली आहे. तरी हा दरोडा संध्याकाळच्या वेळात पडला आहे. घरात कुणी नसल्याचा अंदाज घेत चोरट्यांनी घरात शिरकाक केला तोच 65 वर्षिय वृध्द जगन्नाथ कर्डिले (Jagganath Kardile) यांना कुणीतरी घरात शिरल्याची कुणकुण जाणवली. जगन्नाथ यांनी बाहेर येवून बघतात तर काय तोडांवर मास्क घालून शिरलेले चोरटे. जगन्नाथ यांनी जोरा जोरात ओरडायला सुरवात केल्यास चोरट्यानी एक जड वस्तु वृध्दाच्या डोक्यात मारली. यांत जगन्नाथ यांचा मृत्यू झाला.

 

नाशिक (Nashik) शहरात दरोडे खोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नाशिककरांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. नाशिक पोलिस (Nashik Police) या घटनांचा तपास करत असले तरी ढोस काहीही हाती लागलेले नाही. गेल्या चाळीस दिवसातली ही पाचवी घटना आहे. तरी कार्डिले कुटुबियांवर (Kardile Family) दुखाचा डोंगर कोसळला आहे. चोरीसह घरातील वयस्कास अशा पध्दतीने गमावल्याने दुखद वातावरण आहे. (हे ही वाचा:- Pune: पोलीस असल्याचे भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातून अटक, लाठीसह कारही केली जप्त)

 

शहरासह जिल्ह्यात दरोड्याच्या घटनांचे सत्र सुरुच आहे. कालच सिन्नर (Sinnar) तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे सशस्त्र दरोड्याची दुसरी घटना घडली. तर काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील ढकांबे परिसरात कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून जबरी लूट केली होती. नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नाशिकचे पोलीस काय करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.