IPL Auction 2025 Live

Nashik Onion Price: नाशिक येथे कांदा लिलावास पुन्हा सुरुवात, दर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम

कांद्याला जास्तीत जास्त 2661 रुपये म्हणजेच सरासरी 1900 रुपये तर कमीत कमी 800 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Onion | Representational image (Photo Credits: pxhere)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये पुन्हा लिलावांना सुरुवात झाली. पण लिलाव जरी सुरु झाले तरी कांद्यांचे भाव मात्र घसरले. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) निर्णयाच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे बंद असलेले लिलाव शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज सुरू झाले.पण कांद्याचे भाव घसरल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गात चिंता पाहायला मिळत आहे. कांद्याचे भाव घसरल्याने व्यापारी आणि शेतकरी वर्ग दोन्ही हवालदिल झालेले पहायला मिळत आहे. (हेही वाचा - Nashik Onion Market: नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार, व्यापाऱ्यांचा संप मागे)

आज 11 डिसेंबर रोजी लालसगाव बाजार समितीमध्ये 400 वाहनातून सहा ते सात क्विंटल कांद्याची आवाक झाली होती. कांद्याला जास्तीत जास्त 2661 रुपये म्हणजेच सरासरी 1900 रुपये तर कमीत कमी 800 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. सलग तीन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले तर परवाना रद्द करण्यता येईल असे निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले होते.

जवळपास 80 टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीची तडाखा बसला. फक्त 20 टक्केच कांदा वाचला.त्यानंतर कांद्याला चांगला भाव देखील मिळू लागला होता.  लाल कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल समाधानकारक भाव मिळत असल्याने उरलेल्या कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तरी निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.