Nashik Leopard Attack: पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, नाशिकच्या चांदवड तालुक्यातली घटना
प्रसाशनाकडून त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी ही केली जात आहे.
Nashik Leopard Attack: नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वेर आदी भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत असताना आता चांदवडमध्ये देखील बिबट्याच्या हल्याची घटना घडली आहे. चांडवड तालुक्यातील कानमंडे येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. भगवंत गोविंद चौधरी हे सकाळी पिकाला पाणी देत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भगवंत गंभीर जखमी झाले आहेत.
चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कानमंडाळे शिवारात सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बचावासाठी प्रयत्न केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती सरपंच संजय शिंदे यांनी त्वरित वनविभागाला दिली. वनविभागाने येथे पिंजरा लावला आहे. या घटनेने परिसराक खळबळ माजली आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा वावर हा आता सामन्य झाला असून रोज बिबट्याट्या हल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रसाशनाकडून त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी ही केली जात आहे.